अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :- शासकीय विलानीकरणाच्या मागणीसाठी राज्यात आजही अनेक ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. यातच नगर जिल्ह्यातून एक महत्वाची माहिती समोर येत आहे.
नगर जिल्ह्यातील अकोले व पाथर्डी तालुक्यातील आगारांतून एकही बस धावली नाही. जिल्ह्यात खासगी वाहतूक जोमात सुरू आहे. त्यांमुळे खासगी वाहनाचे चांगलेच फावले आहे.
मागील अडीच महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे एसटीची सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. आज अखेर एसटीचे एक हजार २६९ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत.
सध्या जिल्ह्यातील ११ आगारांपैकी सध्या नऊ आगारांतून थोड्याफार प्रमाणात बस सुटत असल्याने प्रवाशांना थोडा फार प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
सध्या शेवगाव, तारकपूर, कोपरगाव, नेवासे, श्रीरामपूर, जामखेड, संगमनेर, पारनेर, श्रीगोंदे या ९ आगारांतून १२० बसच्या माध्यमातून जिल्ह्यासह जिल्ह्या बाहेरील प्रवाशांना सुविधा पुरविली जात आहे.
१२० बसच्या माध्यमातून दैनंदिन २५० फेऱ्या होत आहे. याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- p