अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :- २० हजाराच्या कर्जापोटी सावकारांच्या जाचाला कंटाळून संगमनेर तालुक्यातील राजापुर या गावातील एकाने आत्महत्या केल्यानंतर येथील दोघा सावकारांना पोलिसांनी अटक केली आहे.
आता या प्रकरणातील दुसऱ्या सावकाराची देखील ओळख पटली असून सुदाम देविदास दुधे आणि बालकिसन हनमंत खंडेलवाल अशी अटक केलेल्या दोघा सावकारांची नावे आहेत.
सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास राजापुर येथील अण्णासाहेब निवृत्ती नवले (वय ४३) यांनी राहत्या घरी सावकाराच्या जाचास कंटाळून आत्महत्या केली होती.
त्यामुळे नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिल्यानंतर दुधे व खंडेलवाल यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नवले यांनी दुधे व खंडेलवाल याच्याकडून २० हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्यापोटी त्यांनी या सावकारांना तब्बल दीड लाख रुपये देवून देखील त्यांचा व्याजाच्या पैशासाठी तगादा सुरुच होता.
त्यामुळे नवले यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. दरम्यान, पोलिसांनी तक्रार दाखल होताच दोन्ही सावकारांना अटक केल्याने शहरातील बेकायदा सावकारकीची विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या बेकायदा सावकारांवर नियंत्रण ठेवण्यात अथवा त्यांच्यावर कारवाई करण्यात येथील उपनिबंधक खाते अपयशी ठरले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम