अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :- ट्रकवरील चालक किसन साहेबराव वाघ याने आपल्या ताब्यातील लोखंडी पाईप घेऊन जाणारा ट्रक भरधाव वेगाने चालवून अपघात केला. तसेच गाडी रोडचे खाली गेल्यावर आग लावून सदर गाडीचे नुकसान केले.
हा धक्कादायक प्रकार कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील गोदावरी नदीजवळ घडला आहे. या प्रकरणी आरोपी चालक किसन साहेबराव वाघ याच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी कि, फिर्यादी मालक बाळासाहेब बारकू गांगुर्डे (वय-49) यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी चालक किसन आपल्या ताब्यातील वरील क्रमांकाचा टाटा ट्रक हा पाईपने भरलेला होता.
तो घेऊन सिन्नर वरून औरंगाबादच्या दिशेने घेऊन जात होता. संवत्सर शिवारात रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने चालवून
त्याच्या ताब्यातील बारा चाकी लोखंडी पाईपचा ट्रक उलटविला व ट्रक रोडचे खाली नेऊन तिला आग लावून गाडीचे नुकसान केले आहे. याबाबत आरोपी चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम