डुकरांच्या उच्छादामुळे शेतकर्‍यांच्या पिकाची नासधूस; ग्रामस्थही हैराण

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथे डुकरांनी उच्छाद मांडला आहे. डुकरांनी ग्रामपंचायतीने लागवड केलेल्या झाडांसह आजुबाजुच्या शेतकर्‍यांच्या पिकाची नासधूस केली आहे.

या नासधुसीमुळे गावकऱ्यांसह बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ ग्रामपंचायतीने गावठाण भागात मोठ्या प्रमाणात रोजगार हमी योजनेतून वृक्ष लागवड केली आहे.

गावातील डुकरांनी या लागवड केलेल्या झाडांची मोठ्या प्रमाणावर नासधूस केली आहे. त्याचबरोबर गावठाण लगतच्या भागात शेती आहे. डुकरांच्या उच्छादामुळे शेतकर्‍यांच्या पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

दररोज होणाऱ्या या नुकसानाला आता शेतकरी देखील कंटाळले आहे. त्यामुळे याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांसह लगतच्या शेतकर्‍यांमधून होत आहे.

ग्रामपंचायतीने याबाबत गंभीर दखल घेत या डुकरांच्या मालकांना नोटिसा बजावल्या आहेत. ग्रामपंचायतीने कडक भूमिका घेऊन या डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe