अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :- भारतात कोरोनाची तिसरी लाट सुरु आहे. कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता सरकारने 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोरोना लसीकरण सुरू केलंय.
तर 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्यांनाही बूस्टर डोस दिले जातायत. एकीकडं लसीकरण मोहीम तीव्र गतीने सुरु असतानाच सध्या सगळ्यांना एक प्रश्न पडला आहे तो म्हणजे आता निरोगी बालकांनाही बूस्टर डोसची गरज आहे का?
याच मुद्द्यावर जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, निरोगी मुलं आणि किशोरवयीन यांना कोरोनाच्या बूस्टर डोसची आवश्यकता असल्याचा कोणताही पुरावा अजून मिळालेला नाही.
दरम्यान अमेरिका, जर्मनी आणि इस्रायलसह इतर देशांनी मुलांना बूस्टर डोस देण्यास सुरुवात केलीये. तसेच बूस्टर डोसचा उद्देश गंभीर आजार असलेल्यांचं संरक्षण करणं असा आहे.
आरोग्य कर्मचार्यांनाही याची गरज आहे, त्यामुळे त्यांनाही बूस्टर डोस दिले जातायत. मात्र अजूनही बूस्टर डोसवर अजून खूप अभ्यासाची गरज आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम