अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :- बंगलादेशमधील प्रसिद्ध अभिनेत्री राइमा इस्लाम शिमू यांची हत्या करण्यात आलीय.धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणामध्ये त्यांच्या पतीलाच पोलिसांनी अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिलीय.
17 जानेवारी रोजी काही स्थानिक लोकांनी कदमटोली येथील अलीपुर ब्रिज जवळ पोत्यात कोंबलेल्या अवस्थेत अभिनेत्रीचा मृतदेह दिसल्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर गायब झालेल्या अभिनेत्री राइमाची निर्घूण हत्या केल्याचे स्पष्ट झाले.
राइमा हिचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर तिच्या शरिरावर अनेक जखमा आढळून आल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राइमाची हत्या झाल्यानंतर तिला पोत्यात कोंबून पुलावरुन फेकून दिले.
पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमर्टमसाठी सलीमुल्लाह मेडिकल कॉलेज रुग्णालयात पाठवला आहे. राइमा शिमूची हत्या होण्याच्या काही दिवस आधी तिचा पती शखावत अली आणि नातेवाईकांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात केली होती.
मात्र राइमाचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी पती शखावत अलीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. अलीच्या ड्रायव्हरची देखील पोलिसांनी चौकशी केली.
पोलिसांना शखावत अलीच्या संशायस्पद हालचाली आणि देहबोलीवरुन त्याच्यावर संशय आल्याने त्याची कसून चौकशी केली असता त्याने चौकशीअंती मीच पत्नी राइमाचा खून केल्याचे कबूल केले.
घरगुती भांडाणांमुळे मी असे केल्याचे त्याने सांगितले. ढाकाच्या वरिष्ठ न्यायदंडाधिकारी राबेया बेगम यांनी राइमाचा पती शखावत अली आणि त्याच्या ड्रायव्हर मित्राला चौकशीसाठी तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम