अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- कर्जत तालुक्यातील राशीन येथील श्री जगदंबा देवी मंदिर येथे एका युवकाने देवीची विटंबना केल्याने राशीन मध्ये एकच खळबळ माजली सदर आरोपीवर कायदेशीर कडक कारवाई करावी अशी मागणी करत रात्री राशीन येथे ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले.
पोलिसांनी सदर आरोपीला अटक केली आहे. काल सायंकाळी ६:५० वाचे सुमारास श्री जगदंबा देवी मंदिरामध्ये विनय मेघराज बजाज (वय २७ वर्षे) रा. राशीन, ता. कर्जत) हा इसम मंदिरामध्ये येवून देवीच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये चौथऱ्यावर उभे राहून देवीच्या मुर्तीची विटंबना केली व तेथून निघून गेला.
या प्रकाराने समस्त ग्रामस्थांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. सदरील विकृत इसम याचेविरुध्द कायदेशीर कडक कारवाई व्हावी यासाठी ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले सदरील इसमास अटक करून त्याच्या विरुध्द धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करून कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी.
जो पर्यंत सदरील विकृत इसम विनय बजाज यास अटक होत नाही तो पर्यंत राशीन गाव हे बेमुदत बंद ठेवण्यात येत आहे असे निवेदनात म्हटले आहे.
सायंकाळी राशीन येथील महात्मा फुले चौकात आंदोलन सुरू झाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी भेट देऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
तर आ. रोहित पवार यांनी आंदोलनात सहभागी होऊन या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत आपण जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेशी बोललो आहेत, असे कृत्य करणाऱ्या विकृत व्यक्तीवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली.
अशा घटनेत पोलिसांना कोणाचाही फोन येणार नाही मात्र जरी कोणाचा ही फोन आला तरी त्याचा विचार करू नये असे आ.पवार म्हणाले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम