नगरकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी ! पाणी पुरवठा होणार विस्कळीत

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- नगरकरांनो पाण्याचा वापर जपून करा कारण कि पाणीपुरवठा होणार आहे विस्कळीत….ऐन वेळेला अडचण नको म्हणून शहरात कसे असणार आहे पाणी पुरवठ्याचे नियोजन ते आधी जाणून घ्या…

गुरुवारी (दि.२०) सायंकाळी ५.४५ ते ६.०० या वेळेत विज वितरण कंपनी कडुन नगर शहर पाणी पुरवठा योजनेचा विज पुरवठा खंडीत झाल्याने पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे.

विज पुरवठा सुरु झाल्या नंतर बंद पडलेला पाणी उपसा सुरु करित असताना विळद पंपींग स्टेशन येथिल सब-स्टेशन मध्ये तांत्रिक बिघाड झाला. दुरुस्तीचे काम युध्द पातळीवर पुर्ण करण्यात येत आहे.

यानुसार रात्री १०.०० वाजे पर्यंत विज पुरवठा सुरु होणे व तदनंतर बंद पडलेला पाणी उपसा टप्प्या- टप्प्याने सुरु होणे अपेक्षित असल्याचे महापालिका प्रशासनानं कळविले आहे.

गुरुवारी रात्री स्टेशन रोड भागास पाणी पुरवठा होवू शकलेला नाही. या भागास आज पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. खंडीत विज पुरवठया मुळे शहर पाणी वितरणाच्या टाक्या निर्धारित वेळेत भरणे शक्य होणार

नसल्याने शुक्रवारी (दि.२१ ) रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास सिद्धार्थ नगर, लाल टाकी, दिल्लीगेट, नालेगांव, तोफखाना, चितळेरोड, आनंदी बाजार,

माणिक चोक, कापडबाजार, नवीपेठ, जुने मनपा कार्यलय परिसर भागास उशीराने व दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. तरी नागरिकांनी असलेल्या पाण्याचा वापर कारकसरिने करावा व महानगर पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe