अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- अहमदनगर जिल्ह्यातील स्नेहालय संस्थेतील एका अल्पवयीन मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाला. परमेश्वर गुलाब जैद (वय 15) असे मृत मुलाचे नाव आहे.
ही घटना निंबळक (ता. नगर) शिवारातील तलावात बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

परमेश्वरबरोबर आणखी एक मुलगा होता. तो सुदैवाने वाचल्याची माहिती मिळते. ही घटना नेमकी कशी घडली याची चौकशी बालकल्याण समितीमार्फत होत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम