आता नगर तालुक्यातील ‘त्या’ सरपंचांना पंचायत समितीने दिल्या नोटिसा…!

Ahilyanagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- नगर तालुक्यातील ८ ग्रामसेवकांवर बदलीच्या ठिकाणचा पदभार मुदतीत स्वीकारला नसल्याचा ठपका ठेवत वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्यात आली.

तर संबंधित सरपंच उपसरपंच यांना पदभार स्वीकारू दिला नाही. म्हणून नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, काही ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी बदली झालेल्या ग्रामसेवकांना पदभार स्वीकारण्यास मनाई केली तसे लेखी ही पंचायत समितीकडे देण्यात आले आहे.

सरपंच ग्राम विकासाचा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून तसेच ग्रामस्थांच्या मागणीनुसार आम्ही ग्रामसेवकांच्या बदलीसाठी पंचायत समितीकडे वारंवार मुदतवाढ मिळविण्यासाठी विनंती करत होतो असे सांगत आहेत. या प्रकरणी पंचायत समिती मार्फत एका अधिकाऱ्याची नियुक्ती करून संबंधित ग्रामसेवकांना नियुक्तीच्या गावी पदभार देण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या.

संबंधित अधिकाऱ्या समक्ष ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला सद्यस्थितीत गावात असलेल्या ग्रामसेवकास मुदतवाढ देण्याचे सांगून नवीन ग्रामसेवकास पदभार देत नसल्याचे लेखी दिले आहे.

तसा त्या अधिकाऱ्याने पंचायत समितीकडे सादर केलेला आहे. दरम्यान याप्रकरणी ग्रामसेवकांवर पंचायत समिती मार्फत नोटीस काढण्याचे काम चालू होते.

यावर पंचायत समितीने आठ ग्रामसेवकांवर वेतनवाढ रोखण्याची कारवाई केली. त्यापाठोपाठ आता त्या गावातील सरपंचांना नोटीस काढण्यात आल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe