अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- कर्जत नगरपंचायतीच्या निकालात आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली स्पष्ट बहुमत मिळाले असून, राष्ट्रवादी काँग्रेसची निर्विवाद सत्ता स्थापन झाली आहे.
कर्जतच्या जनतेने विकासाच्या बाजूने कौल दिला असून तेथील जनता रोहित दादांच्या बरोबर आहे, हे पुन्हा एकदा या निकालाने सिद्ध केले, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी यांनी केले.
या निकालाने संपूर्ण मतदारसंघात नवचैतन्य निर्माण झाले असून सर्वत्र आनंदी माहोल तयार झाला, असेही ते म्हणाले. निकाल जाहीर होताच जामखेड येथे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी यांच्या कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते एकत्र येत फटाके फोडून व एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी कोठारी म्हणाले, आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास सुरू असून, कर्जतच्या जनतेने विकासाच्या व्हिजनवर विश्वास ठेवल्याचे या निकालातून स्पष्ट होत आहे.
पुढच्या काळातही न भूतो न भविष्यती असा विकास रोहित दादांच्या माध्यमातून होणार असून जनता त्यांच्या बरोबर सदैव असल्याचे सिद्ध झाले.
यावेळी प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, तालुका सरचिटणीस प्रकाश काळे, माजी ग्रामपंचायत सदस्य संजय डोके, इस्माईल सय्यद, कोअर कमिटीचे सदस्य प्रदीप शेटे, धनराज राजगुरू, अ
कबर शेख, शहर उपाध्यक्ष प्रा. राहुल आहिरे, युवा कार्यकर्ते दादा महाडिक, बजरंग डुचे, ऋषी कुंजीर, नामदेव मेनकुदळे, प्रा. विनीत पंडित, वसीम शेख आदी उपस्थित होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम