अंगावर काटा आणणारी आकडेवारी ! अहमदनगर मनपाचे तब्बल इतके लोक कोरोनाबाधित…

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असून दररोज रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवणाऱ्या महापालिकेतील सात अधिकाऱ्यांसह ५४ कर्मचारी कोरोना बाधित झाले आहेत.

त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेची तारांबळ उडाली आहे. शहरात सद्यस्थितीत सुमारे २ हजार ७०० रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, महिनाभरात कोणत्याही बाधिताचा मृत्यू झाला नाही.

कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना मनपा प्रशासनामार्फत हाती घेण्यात आल्या आहेत. दक्षता पथकाकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे.

तिसऱ्या लाटेत मनपाचे तब्बल ५४ प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी बाधित झाले आहेत. दरम्यान, नगर शहरात महिनाभरात एकही बाधिताचा मृत्यू झाला नसल्याची दिलासादायक माहिती आहे.