आरोपीस अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच केली मारहाण…?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :-  येथील तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल असलेल्या नेवासा तालुक्यातील भेंडा येथील आरोपीस अटक करण्यासाठी गेलेल्या तोफखाना पोलिसांवर आरोपींच्या नातेवाईकांनी हल्ला केला व आरोपीला पळून जाण्यास मदत केल्याची घटना घडली.

याबाबत पोकॉ सातपुते यांनी नेवासा पोलीस ठाण्यात आरोपीच्या चौघा नातेवाईकांवर सरकारी कामात अडथळा, आरोपीला पळून जाण्यास मदत व मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, कौस्तुभ महेश मोडे ( रा.वांबोरी ता. राहुरी) व सागर मच्छिंद्र धनवडे( रा. भेंडा ता. नेवासा) हे दोघे आरोपी आहेत.

पैकी सागर मच्छिंद्र धनवडे यास अटक करण्यासाठी भेंडा येथेएस. एस. क्षीरसागर व व्ही. एन. केदार व मी आरोपीच्या घरासमोर पोहचलो.

आरोपी सागर मच्छिंद्र धनवडे हा घरासमोरच उभा असलेला दिसल्याने त्याला तुला अटक करावयाची असल्याचे सांगून पकडले असता त्याने आरडाओरडा सुरु केला.

त्यावेळी त्याच्या घरातून मच्छिंद्र रामभाऊ धनवडे, सचिन ऊर्फ रुद्रा मच्छिंद्र धनवडे, सोनाली मच्छिंद्र कुसळकर व सुरेखा सागर धनवडे असे बाहेर आले.

त्यांनी आमच्या मुलाला सोडा त्याला घेवून जायचे नाही असे रागाने जोरजोरात म्हणून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करुन ते आमच्या अंगावर धावून आले.

दरम्यान मच्छिंद्र धनवडे व सचिन ऊफर रुद्रा धनवडे यांनी जवळच पडलेले लाकडी दांडके उचलून माझ्या उजव्या पायाच्या गुडघ्यावर जोरात मारल्याने मला मुकामार लागला आहे.

तसेच सोनाली कुसळकर व सुरेखा धनवडे अशांनी माझेशी झटापट करुन माझ्या ताब्यातून आरोपी सागर मच्छिंद्र धनवडे यास सोडवले. वरील चौघेही आम्हाला आडवे उभे राहून झटापट करु लागले. दरम्यान सागर धनवडे पळून गेला.