‘त्या’ ट्रक चालकाला ‘तो’ मुक्काम पडला महागात..!

Ahilyanagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- अलीकडे चोरटे कधी व काय चोरी करतील याबाबत काही सांगता येत नाही. त्यामुळे अनेकदा नवीन घटना ऐकण्यास मिळत आहेत.

नुकतीच पाथर्डी तालुक्यात मुक्काम करण्यासाठी थांबलेल्या ट्रक चालकाने हॉटेलसमोर उभा केलेला सात लाख रुपये किमतीची अशोक लेलँड कंपनीची चौदा टायर मालवाहतूक ट्रक अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे

याबाबत ट्रकचालक सरफराज रब्बानी सय्यद याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

सरफराज रब्बानी सय्यद हा अशोक लेलँड कंपनीची चौदा टायर मालवाहतूक ट्रक हॉटेल दीपाली मुक्कामी थांबला होता. ट्रक रात्रीच्या वेळी कोणीतरी अज्ञात वन्यक्तीने चोरून नेला आहे.

सकाळी उठल्यानंतर ट्रक चोरीला गेल्याचे चालकाच्या लक्षात आले. चालकाने पोलिस ठाण्यात पोलिसांना घटनेची कल्पना दिली.

मात्र, तुम्ही तपास घ्या व नंतर तक्रार दाखल करा, असे सांगितल्याने चालकाने चौकशी केली. मात्र, ट्रक मिळून आला नाही. (एमच ४० बीएल-१७२९) असा नंबर असलेली लाल रंगाची ट्रक अज्ञात इसमाने चोरून नेली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe