अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- लग्न म्हंटल की, विधी, पूजा, मंगलाष्टके व सप्तपदींचा सोहळा त्याला निसर्ग पूजेची जोड देत नवदाम्पत्यांनी वृक्षरोपण करुन विवाहित जीवनास प्रारंभ केले.
शहराजवळील नित्य सेवा सोसायटी वसंत टेकडी येथे शुभम पासकंटी व वैष्णवी क्यादर यांचा विवाह सोहळा थाटात पार पडताच वधू-वरांनी आंब्याचे वृक्ष आपल्या घराच्या अंगणात लावले.

या नवदाम्पत्यांनी वृक्षारोपणाने लग्नात दिलेला पर्यावरण संवर्धनाचा संदेश सर्वांनाच भावला. जागतिक तापमानात सातत्याने होणारी वाढ, वाढत्या शहरीकरणामुळे झांडांची कत्तल, निसर्गाचा ढासाळलेला समतोल यामुळे दुष्काळासह अवकाळी पाऊस या नैसर्गिक संकटांचा सामना सर्वांना करावा लागत आहे.
पर्यावरणाचे समतोल साधण्यासाठी वृक्षरोपण व संवर्धन हा एकमेव पर्याय असून, नवदाम्पत्यांनी वृक्षरोपण करुन समाजापुढे एक चांगला आदर्श ठेवल्याचे पद्मश्री पोपटराव पवार यांनी सांगितले.
वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाचे चळवळीत रुपांतर होणे गरजेचे आहे. जन्म, वाढदिवस, विवाह, मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या स्मरणार्थ तसेच सण, उत्सव काळात वृक्षरोपण करुन ही चळवळ व्यापक होणार असल्याची भावना पवार यांनी व्यक्त केली.
तसेच वधूवरांनी विवाहानिमित्त एक झाड लावून वाढवले तर संसाराच्या वेळेप्रमाणे पर्यावरण ही बहरेल वैवाहिक जीवनात सोबत एक झाड वाढवण्याचा संकल्प सर्वांनी केला तर अनेक झाडे आपण वाढू शकतो या हेतूने हा उपक्रम हाती घेऊन एक लग्न एक झाड लावण्याचा उपक्रम घेतला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम