पुणतांबा-रस्तापूर ग्रुप ग्रामपंचायतीची ग्रामसभा होणार ऑनलाईन

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :-  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव जिल्ह्यासाठी पुन्हा एकदा कठोर निर्बंध घेऊन आला आहे. यातच अनेक गोष्टींवर प्रशासनाने निर्बंध देखील घातले आहे.

यातच पुणतांबा-रस्तापूर ग्रुप ग्रामपंचायतीची ग्रामसभा ऑनलाईन आयोजित करण्यात आलेली आहे. ग्रामस्थांनी ऑनलाईन ग्रामसभेस उपस्थित रहावे, असे आवाहन सरपंच डॉ.धनंजय धनवटे यांनी केले आहे.

दरम्यान जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता खबरदारी म्हणून पुणतांबा रस्तापूर ग्रुप ग्रामपंचायतीची 26 जानेवारीची ग्रामसभा प्रथमच ऑनलाईन पद्धतीने होत आहे.

पुढील विषयावर ग्रामसभेत घेण्यात येणार असल्याचे सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांनी स्पष्ट केले. मागील सभा इतिवृत वाचन करणे, विविध विकास योजना कामकाज आढावा घेणे,

सन 2022-23 आपले गाव आपला विकास आराखडा वाचन करणे, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजनेबाबत छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुणतांबा गावी स्मारक उभारणी करणे

बाबत ऐनवेळी शासनाने कळविलेल्या विषयांवर चर्चा विचारविनिमय करणे अध्यक्ष यांचे पूर्व परवानगीने ऐनवेळी येणार्‍या विषयांवर चर्चा विचार विनिमय करणे, ग्रामस्थांना सभेची लिंक सभेचे एक दिवस अगोदर आपणास कळविण्यात येईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News