अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- ओमिक्रॉनच्या एंट्रीनंतर राजधानी दिल्लीत कोरोनाचा कहर सुरू असून याचा फटका संसद भवनालाही बसला आहे. संसद भवनात पुन्हा एकदा करोनाचा स्फोट झाला असून
आणखी ८७५ कर्मचाऱ्यांना लागण झाल्याचे आज स्पष्ट झाल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोनाची टेस्ट करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. संसद भवनात गेल्या काही दिवसांपासून करोनाची दहशत पसरली आहे. संसद भवनात काम करणारे कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी करण्यात आली असता त्यात ८७५ कर्मचारी कोरोना बाधित चिंता वाढली आहे.
या शिवाय उपराष्ट्र्पती व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची लागण झाल्याचे ट्विट करून सांगितले आहे. तसेच त्यांनी ट्विट मध्ये सांगितले कि, काही दिवसांमध्ये जे लोक माझ्या संपर्कात आले त्यांनी स्वत:ला आयसोलेट करून घ्या.
कोव्हिडची चाचणीही करून घ्या. सध्या व्यंकय्या नायडू हे हैदराबाद मध्ये असून, त्यांनी कोव्हिड प्रोटोकॉलचं पालन करण्यासाठी स्वत:ला एक आठवड्यासाठी आयसोलेट केले आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेश जवळ आले असताना संसद भवनात करोनाचा स्फोट झाल्याने स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणा वेगवान पावले उचलत आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 3,33,533 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तीन कोटींवर पोहोचली.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 4,89,409 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी अनेक रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
तर काही जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रिकव्हरी रेट 93.18 टक्क्यांवर आहे. ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या 10000 पेक्षा जास्त झाली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम