सहा जण भाजीपाला विक्रेत्याच्या घरात घुसले आणि…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- किरकोळ कारणातून भाजीपाला विक्रेत्यास शिवीगाळ, मारहाण करणार्‍या सहा जणांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पांडूरंग मारूती काळे (वय 44 रा. श्रेयशनगर, तपोवन रोड, अहमदनगर) असे मारहाण झालेल्या भाजीविक्रेत्याचे नाव आहे. त्यांनी फिर्याद दिली आहे.

अशोक गिते, सोमनाथ गिते व चार अनोळखी इसम यांचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक गिते याला फिर्यादी हे तु माझ्या घराकडे का पाहतो असे विचारण्यासाठी गेले असता

अशोक याने फिर्यादीला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर काही वेळाने अशोक गिते, सोमनाथ गिते व इतर चौघांनी फिर्यादी यांच्या घरात घुसून फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

भांडण सोडविण्यासाठी मध्ये आलेल्या फिर्यादीच्या दोन्ही मुलींना आरोपींनी शिवीगाळ केली. आरोपी फिर्यादीला म्हणाले, तु जर आमच्या नादी लागला तर तुला व तुझ्या मुलींना जीवंत सोडणार नाही, असे म्हणाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe