तब्बल नऊ हजार जणांची ‘एमपीएससी’ परीक्षेला दांडी

Published on -

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेतलेली राज्यसेवा पूर्व परीक्षा अहमदनगर शहरातील ३४ उपकेंद्रात शांततेत संपन्न झाली. नगरमध्ये या परीक्षेसाठी एकूण १२ हजार ४५२ परीक्षार्थींची नोंदणी केली होती.

यापैकी सकाळच्या सत्रात ४ हजार ५३६ तर दुपारच्या सत्रात ४ हजार ५५३ असे ९हजार ८९ परीक्षार्थी गैरहजर राहिले. ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी जवळपास दीड हजार फौजफाटा तैनात होत.

राज्य सेवेतील विविध पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली हि परीक्षा अहमदनगर शहरातील ३४ केंद्रावर दोन सत्रात घेण्यात आली.

नगर उपविभागीय दंडाधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी या परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले होते.

या परीक्षा केंद्राच्या परिसरात सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंतच्या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी याव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती.

परीक्षा संचालनासाठी समन्वय अधिकारी, भरारी पथक, पर्यवेक्षक, सहायक असा जवळपास १ हजार ५०० अधिकारी-कर्मचारी यांचे मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते. परीक्षे दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe