अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :- नवरा बायकोचे नाते एक असे नाते आहे, ज्यामध्ये दोन लोक आयुष्यभर एकमेकांशी नातं जोडतात. नवरा बायकोचं नातं प्रेमाशी जोडलेलं असत. या नात्यामध्ये प्रेम आणि भांडण दोन्ही असतं.
ज्यामुळे हे नातं अधिक दृढ होतं. हे नाते जेवढे मजबूत असतात तेवढेच नाजूक देखील असतात. अशीच घटना नगर तालुक्यात घडली.
बहिरवाडी येथे पतीचे निधन झाल्यानंतर पतीचा विरह सहन न झाल्याने अवघ्या काही तासातच पत्नीनेही प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, येथील पाराजी शंकर दारकुंडे यांचे सोमवार सकाळी निधन झाले. त्यांच्यावर दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
आयुष्यभर संसाराचा गाडा चालव ताना एकमेकांच्या आणाभाका खात मोठ्या कष्टान संसार फुलविण्यात आला होता. सुमारे साठ वर्षे एकत्रित संसार करणाऱ्या
तसेच एकमेकांच्या सुखदु:खात सदैव साथ देणाऱ्या पतीचा विरह सहन न झाल्याने त्यांच्या पत्नी गयाबाई यांनीही आपले प्राण सोडले.
पतिच्या विरहाचे दु:ख सहन न झाल्याने त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व त्यातच त्यांचे निधन झाले. एकाच दिवशी पती-पत्नीच्या मृत्यु झाला. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम