वर्ध्यात भीषण अपघात ! गाडी पुलावरुन कोसळून सातजण जागीच ठार

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :- वर्धा-देवळी मार्गावर रात्री दीडच्या सुमारास झालेल्या अपघातात सात युवक जागीच ठार झाले आहेत. यामध्ये एका आमदाराच्या मुलाचीही समावेश असल्याची माहिती समोर आलीय.

सावंगी येथील वैद्यकीय महाविद्यालयातील तीन मुलांबरोबरच एका आमदाच्या मुलाचा यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. देवळी येथून वर्ध्याला येत असताना सेलसुराजवळ कारला अपघात झाला.

नियंत्रण सुटल्याने सेलसुरा जवळील नदीच्या पुलावरून कार खाली कोसळली. जवळपास 40 फूट उंच असलेल्या पुलावरून कार खाली पडल्यानं भीषण अपघात झाला.

सर्व मृतक 25 ते 35 वयोगटातील असल्याची माहिती आहे. यामध्ये गोंदियातील तिरोडा गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयभाऊ रहांगडाले यांचा मुलगा अविष्कार रहांगडाले याचाही समावेश आहे.

मृतांची नावे निरज चौहान (एमबीबीएस शेवटचं वर्ष), अविष्कार रहांगडाले (एमबीबीएस पहिलं वर्ष), नितेश सिंह (इंटर्न), विवेक नंदन (एमबीबीएस अंतिम वर्ष), प्रत्युंश सिंह (एमबीबीएस अंतिम वर्ष),

शुभम जैस्वाल (एमबीबीएस अंतिम वर्ष) आणि पवन शक्ती (पहिलं वर्ष) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावं आहे. यापैकी अविष्कार हा तिरोडाचे आमदार विजय रहांगडालेंचा मुलगा होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe