अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :- प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रायलय दरवर्षी पोलिसांच्या शौर्यासाठी ‘पोलीस पदक’ जाहीर करते. यामध्ये यंदा जिल्ह्यातील तिघांना ‘पोलीस पदक’ जाहीर झाले आहेत.
कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक भरत चितांमण नागरे यांना ‘पोलीस शौर्य पदक’ तर नागरी हक्क संरक्षण विभाग (पीसीआर), अहमदनगर येथे कार्यरत असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय एकनाथ तिजोरे व अल्ताफ मोहिउद्दीन शेख यांना ‘पोलीस पदक’ जाहीर झाले आहे.
पोलीस पदकाची मंगळवारी घोषणा झाली. यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील 51 पोलिसांना हे पदक जाहीर झाले आहे. जिल्ह्यातील तिघांचा यामध्ये समावेश आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षक तिजोरे यांनी 33 वर्षे सेवा केली आहे.
राज्यभर गाजलेल्या कोठेवाडी (ता. पाथर्डी) दरोडा प्रकरणाविषयी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित झाला होता. याचे उत्तरे तिजोरे यांनी व्यवस्थीत पाठविली.
त्यांनी लाचलुचपत विभागात काम करताना अनेक कसेस हाताळल्या. खर्डा (ता. जामखेड) हत्याकांड प्रकरणात वरिष्ठांना वेळेवर अहवाल सादर करण्याबरोबरच अहमदनगर शहरातील मोहरम, गणपती बंदोबस्ताच्या नियोजनात तिजोरे यांनी महत्वाची भूमिका बजावली.
सहायक पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ शेख यांनी प्रकाश कांडेकर खून प्रकरणी आरोपी पकडणे, तपासात मदत करणे, सराईत गुन्हेगार पाप्या शेख याच्यावरील मोक्का प्रस्ताव तयार करणे,
पोलीस अधीक्षक कृष्णा प्रकाश यांच्या कार्यकाळात 12 टोळ्यातील 62 गुन्हेगार हद्दपार करण्यास मदत करणे याशिवाय गावठी कट्टे, काडतुसे, आरोपी अटक, मुद्देमाल हस्तगत करणे आदी प्रकरणात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम