‘ती’दानपेटी पाच वर्षांनंतर उघडणार होते परंतु …..!

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2022 :- सध्या जिल्ह्यातील विविध ठिकाणी चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. दररोज चोर्‍या,घरफोडी अशा घटना घडत आहेत पोलिस प्रशासन या चोरट्यांना जेरबंद करण्यात अपयशी ठरत आहेत.

मात्र आता या चोरट्यांनी मंदिरे लक्ष्य केल्यामुळे सर्वसामान्य भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहेत.

नुकतेच अज्ञात चोरट्यांनी पाईपलाईन रोड वरील एका वस्तीवर असलेल्या पुरातन संकट मोचन हनुमान मंदिराच्या दानपेटीवर डल्ला मारला आहे.

गेल्या तीन वर्षापासून मंदिरातील दानपेटी उघडली गेली नव्हती त्यामुळे या दानपेटी मध्ये लाखो रुपयांचा मुद्देमाल असू शकतो.

मंदिरातील पुजाऱ्यांनी सांगितले की, हे पुरातन मंदिर आहे पाच वर्षानंतर ही दानपेटी उघडली जाते या दानपेटीच्या माध्यमातून मंदिराचे नूतनीकरण करायचे होते

परंतु चोरट्यांनी केलेल्या या कृत्यामुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.