अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2022 :- कर्जत तालुक्यातील १७ गावाच्या पाणी पुरवठा योजनेसाठी ५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मात्र सदर संयुक्त योजनेतून या गावाना पाणी हवे आहे की नाही, याबाबत त्या त्या गावांना अधिकार असून.
या गावांनी ग्रामसभेत निर्णय घेऊन ठराव द्यावा असे आवाहन खा. डॉ सुजय विखे यांनी केले. पूर्वी जीवन प्राधिकरण द्वारे झालेल्या १७ गावाच्या पाणी पुरवठा योजनेतुन अनेक गावांना पाणी पुरवठा मिळाला नव्हता.
यामुळे या योजनेतील अनेक गावांनी जिल्हा परिषदे मार्फत राबविल्या जाणाऱ्या जलजीवन मिशन योजनेतुन आपल्या गावाला पाणी पुरवठा करणारी योजना करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
या साठी १७ गावाच्या योजनेतून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त होती. यावर खा.डॉ.सुजय विखे यांनी महिजळगाव येथे या गावाच्या सरपंच व ग्रामसेवकांची बैठक घेऊन याबाबत माहिती देताना याबाबत २६ जाने.
च्या ग्रामसभेत निर्णय घेऊन आम्हाला कळवावा म्हणजे पुढील निर्णय घेता येईल. जर या गावांना १७ गावाची पाणी पुरवठा योजना हवी नसेल तर मंजूर करून आणलेला ५ कोटींचा निधी परत पाठवला जाईल.
या योजनेतून शाश्वत पाणी मिळणार असून गावांना पाणी मिळण्याची व्यवस्था आहे का याचा विचार करून सर्वानी निर्णय घ्यावा असे आवाहन केले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम