चक्क मुंबईत तब्बल सात कोटींच्या बनावट नोटा जप्त

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2022 :- भारतीय चलनाच्या बनावट नोटा छापून वितरीत करण्याच्या उद्देशाने आलेल्या एका आंतरराज्यीय टोळीला मुंबईत पोलिसांनी ताब्यात घेतलं.

या टोळीकडून तब्बल सात कोटी रुपये, ७ वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल, एक लॅपटॉप आणि काही कागदपत्रं जप्त करण्यात आली आहे.

हि कारवाई दहिसर परिसरात करण्यात आली आहे. पोलिसांनी या टोळीला ताब्यात घेतलं आहे. याबाबत अधिक माहिती अशी, मुंबई शहरात बनावट चलनी नोटा छापून त्या दैनंदिन व्यवहारात आणल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

चार व्यक्ती २००० रुपये किमतीच्या बनावट नोटा विक्री करण्यासाठी दहिसरमध्ये येणार असल्याचं पोलिसांना कळलं. त्याप्रमाणे माहिती मिळालेल्या गाडीची झडती घेतली असता या गाडीमध्ये २००० रुपयांच्या नोटांचे २५० बंडल आढळून आले.

२००० रुपयांच्या एकूण २५ हजार नोटा असे एकूण पाच कोटी रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्यानंतर सविस्तर कारवाई करून, आरोपींची झडती घेतल्यानंतर पोलिसांना ७ वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल फोन्स,

एक लॅपटॉप, आधार कार्ड, पॅनकार्ड, वाहन चालक परवाना, निवडणूक आयोगाचं ओळखपत्र आणि २८,१७० रोख रक्कम सापडली आहे.

या प्रकरणी सविस्तर पंचनामा करण्यात आला असून सात जणांच्या टोळीला अटकही करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News