अहमदनगर ब्रेकींग: वृध्द व्यापार्‍याच्या अंगावर दुचाकी घालून व कोयत्याने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2022 :-  किरकोळ कारणातून व्यापार्‍याच्या अंगावर दुचाकी घालून व कोयत्याने हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. किशोर मिस्त्रीलाल मुथ्था (वय 63 रा. शिल्पा अपार्टमेंट, भन्साळी शोरूमच्या पाठीमागे, अहमदनगर) असे व्यापार्‍याचे नाव आहे.

अहमदनगर शहरातील डावरे गल्लीत बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मुथ्था यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी साहील मोहंम्मद शाकीर सय्यद (रा. कस्तुरी कॉम्प्लेक्स, डावरे गल्ली, अहमदनगर) याच्याविरूध्द खूनाचा प्रयत्न, आर्म अ‍ॅक्ट कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याला कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास किशोर मुथ्था हे त्यांच्या डावरे गल्लीतील सौरव डिपार्टमेंट येथे होते.

त्यावेळी किशोर यांचा मुलगा सौरव मुथ्था व स्वर्णीम मुथ्था अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये बसलेले असताना साहील सय्यद हा तेथे आला व अपार्टमेंटमध्ये दुचाकी पार्किंग करायची नाही, असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी करायला लागला.

नंतर तो किशोर यांच्याकडे दुकानात गेला. तेव्हा किशोर त्याला म्हणाले, पार्किंग आमचे असून मी सदर ठिकाणी गाडी लावणार आहे.

या बोलण्याचा साहील याला राग आल्याने त्याने त्यांच्याकडील दुचाकी किशोर यांच्या अंगावर घातली तेव्हा किशोर बाजूला झाले.

साहील याने दुचाकीच्या डिक्कीतून कोयता काढून किशोर यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विवेक पवार करीत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News