अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :- नगर जिल्ह्यातील बहुचर्चित गौरी प्रशांत गडाख आत्महत्या प्रकरणी राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव यशवंतराव गडाख व त्यांच्या पत्नी सुनिता शंकरराव गडाख यांच्याविरोधात न्यायालयात खासगी फिर्याद दाखल झाली होती.
गुन्हा दाखल होण्यासाठी ऋषिकेश वसंत शेटे यांनी ही खासगी फिर्याद दाखल केली होती. या फिर्यादीवर 23 डिसेंबर 2021 रोजी न्यायालयाने तपासी अधिकारी तोफखाना पोलीस ठाणे यांचा अहवाल मागितला होता. तसेच पुढे या प्रकरणाची पुढील सुनावणी ५ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
दरम्यान, यामुळे मंत्री गडाख अडचणीत येण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ५ फेब्रुवारी रोजी होणार असून, या सुनावणीत काय निर्णय होतो, यावर त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. गडाख समर्थक आणि विरोधक याकडे लक्ष ठेवून आहेत.
निर्णय गडाखांच्या विरोधात गेल्यास त्यांच्यावर पूर्ण ताकदीने राजकीय हल्लाबोल करण्याची तयारी विरोधकांनी केल्याची चर्चा आहे. गडाख यांना मंत्रिपदावरून पायउतार करायचेच, असा राजकीय संकल्प एका नेत्याने केल्याचे म्हटले जाते.
एक उद्योजक, राजकीय पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीवर असलेले तरुण नेते यांना पुढे करून यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जाते. तसेच निर्णय विरोधात गेल्यास ना.गडाख यांचे राजकारण अडचणीत येऊन मंत्रीपद तर जाणार नाही,
या शंकेने त्यांच्या समर्थकांना घेरले आहे. काही विरोधक सोशल मीडियावर सक्रीय आहेत. यासाठी नेवासा, खुपटी, घोडेगाव परिसरातून मिळणारी रसदही चर्चेत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम