अहमदनगर ब्रेकिंग : अज्ञात इसमाचा मृतदेह सापडला

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar Breaking :- कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथे शेतकरी संदिप तुळशीराम शिंदे यांच्या उसाच्या शेतात 50 वर्षीय अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला आहे.

याबाबत सविस्तर बातमी अशी कि संदीप तुळशीराम शिंदे हे शेतात जात असतांना त्यांना उसाच्या कोपर्‍यात अज्ञात इसमाचे प्रेत आढळून आले.

इसमाचे वय 48 ते 50 वर्ष असावे असा अंदाज वर्तवला जात आहे. संदीप शिंदे यांनी ही माहिती कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला कळवली. दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe