अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2022 :- नंदुरबारमध्ये गांधीधाम एक्सप्रेसला आग लागली आहे. नंदुरबार स्थानकात एक्सप्रेस पोहोचण्यापूर्वीच भीषण आग लागल्याने प्रवाशी प्रचंड हादरून गेले.
जीव वाचवण्यासाठी प्रवाशांची एक्सप्रेसमध्ये एकच धावपळ उडाली. काही प्रवाशांनी तर घाबरून आरडाओरड सुरू केली. भडकत जाणारी आग आणि त्यामुळे पसरलेल्या धुराच्या लोटामुळे काही प्रवाशांना तर श्वास घेण्यासही त्रास झाला.
स्टेशन जवळ आल्याने एक्सप्रेसचा स्पीड कमी होता. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनीही घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यास सुरुवात केली आहे.
प्रवाशांना या एक्सप्रेसमधून बाहेर काढण्यात आले असून सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीत हानी झाली नसल्याचं समजते आहे. या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
गांधीधाम पुरी एक्सप्रेस चा आग लागलेल्या डब्याला रेल्वे ट्रॅक वरून बाहेर काढण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे रेल्वे प्रशासनाकडे आग विझवण्यासाठी कुठलीही उपाययोजना नसल्याने आगीने रौद्ररूप धारण केल्याचं पाहायला मिळत
आहे. तर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचं काम सुरू केलं तब्बल दीड तासानंतर आग आटोक्यात आली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम