अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :- नगर तालुक्यातील एका राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेतील कर्मचारी कमी केल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. बँकेने त्वरित कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, या मागणीसाठी ग्रामस्थानी बॅंकेसमोर धरणे आंदोलन केले.
अकोळनेर येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र अकोळनेर येथे बॅंक ऑफ महाराष्ट्राची शाखा आहे. या शाखेत परिसरातील गावांतील नागरिकांचे खाते आहे. या बँकेच्या माध्यमातून सर्व व्यवहार चालतात.

त्यामुळे बँकेत नेहमी गर्दी असते. मात्र, बँकेने अचानक एक कर्मचारी कमी केल्यामुळे ग्राहकाची गैरसोय होत आहे. व्यवहार करताना नागरिकांना ताटकळत बसण्याची वेळ आली आहे.
कर्मचारी कमी करू नये, याबाबत ग्रामस्थांनी वरिष्ठ शाखेला लेखी कळविले होते. मात्र, याची दखल बँकेने घेतली नाही, त्यामुळे ग्रामस्थांनी आज बँकेसमोर धरणे आंदोलन केले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम