नवऱ्यासह सासू- सासऱ्याने सुनेच्या तोंडात बळजबरी फिनाईल ओतले; नगर शहरातील घटना

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  विवाहितेला सासू-सासरे आणि नवरा यांनी मारहाण करत तिला पकडून ठेवत तिच्या तोंडामध्ये फिनायल ओतले. यामुळे ही विवाहिता गंभीर झाली असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

ही धक्कादायक घटना नगर शहरातील स्टेशनरोड वरील जयभीम हाऊसिंग सोसायटीमध्ये घडली आहे. स्नेहा दिनेश मेढे(वय 25) असे पीडित विवाहितेचे नाव आहे.

दरम्यान उपचार सुरू असतानाच कोतवाली पोलिसांनी तिचा जबाब घेतला असता तिने हीच हकीकत सांगितली आहे. यावरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सासरच्यांकडून आपणास वारंवार शिवीगाळ मारहाण होत असते. कपडे धुण्याच्या कारणावरून पतीने मारहान करत मला जमिनीवर पाडले.

त्या वेळी सासू-सासर्‍यांनी माझे पाय पकडून ठेवले. यावेळी पतीने माझ्या तोंडामध्ये फिनायल टाकून मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला असे जबाबात म्हटले आहे.

पोलिसांनी विवाहितेचा पती दिनेश गौतम मेढे, सासु अनिता गौतम मेढे, सासरा गौतम मेढे (रा.जय भीम हौसिंग सोसायटी स्टेशन रोड, अहमदनगर) या तिघांवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe