औद्योगिक संस्थेच्या मालकीच्या जागेची विक्री; पाथर्डीत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :-  बनावट दस्तऐवज बनवून औद्योगिक संस्थेच्या मालकीच्या भूखंडाची विक्री केल्याप्रकरणी पाथर्डीत तिघांविरुद्ध गुन्हादाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात खरवंडी कासार येथील भगवानगड परिसर औद्योगिक उत्पादक संस्थेचे संस्थापक चेअरमन लिंबाजी नाना खेडकर यांनी तक्रार दिली.

त्यानुसार पतसंस्थेचे अध्यक्ष, सचिव आणि कॅशिअर अशा तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीने तक्रारीत म्हटलंय की, ‘संस्थेच्या नावाने खरवंडी कासार येथे जमीन खरेदी केलेली होती.

खरवंडी कासार येथीलच वसंतराव नाईक ग्रामीण पतसंस्थेचा सचिव गणेश बापूराव खेडकर याने पतसंस्थेच्या लेटरपॅडचा गैरवापर करत बनावट दस्तऐवज तयार केले.

संस्थेचे अध्यक्ष दिनकर नाना खेडकर यांना औद्योगिक संस्थेच्या भूखंडाचे व्यवहार करण्यास अनुमती दिली. दिनकर खेडकर यांनी पतसंस्थेचा कॅशिअर राजेंद्र शहादेव दौण्ड याला संस्थेच्या मालकीच्या भूखंडातील प्लॉट साडेतीन लाख रुपयाला विकला.

या व्यवहारातून जमा झालेली रक्कम मात्र औद्योगिक संस्थेच्या खात्यात न भरल्याने लिंबाजी खेडकर यांनी गणेश खेडकर, दिनकर खेडकर आणि राजेंद्र दौण्ड यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe