विरोधक आज सरकारला घेरण्याच्या तयारीत…आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :-  संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून (सोमवार) सुरू होत आहे. या अधिवेशनावर कोरोनासोबत पाच राज्यांत होत असलेल्या विधानसभा निवडणुकांचेही सावट आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प मांडतील या अर्थसंकल्पाकडेच अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.

देशात करोना महामारीचा जोर पुन्हा वाढल्याने अधिवेशनातही करोनाविषयक नियमांचे पालन केले जाणार आहे. उत्तर प्रदेशसह चार राज्यांची सत्ता टिकवण्याचे

आव्हान केंद्रसत्तेतील भाजपपुढे उभे ठाकले असताना विरोधकांनी ती संधी साधून सरकारला विविध प्रश्नांवर घेरण्याची रणनीती आखली आहे.

विशेषतः पेगासस प्रकरण, शेतीप्रश्न तसेच पूर्व लडाखमधील चीनची घुसखोरी आदी प्रमुख मुद्यांवर विरोधक सरकारला कोंडीत पकडण्यासाठी सज्ज झाले आहेत.

आजअधिवेशनाच्या पहिल्या दिवशी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2021-22 सालाचे आर्थिक सर्वेक्षण सादर करणार आहेत. मंगळवारी अर्थमंत्री सीतारामन संसदेत यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प मांडतील.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात होणार आहे. सेंट्रल हॉल आणि दोन्ही सभागृहांत एकत्र जमलेल्या लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांना राष्ट्रपती संबोधित करतील.

त्यानंतर अर्थमंत्री सीतारामन आर्थिक सर्वेक्षण संसदेत सादर करतील. करोना महासाथीची तिसरी लाट सुरू असल्याने लोकसभा आणि राज्यसभेत सुरक्षित अंतराचे पालन केले जाणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe