अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :- द्राक्ष उत्पादकांनी मोठी गुंतवणूक केली आहे. द्राक्ष उत्पादनासाठी मोठा खर्च होतो त्यापटीत अपेक्षित उत्पन्न मिळणे, गरजेचे असतांना शेतकऱ्यांना तेवढे उत्पन्न मिळत नाही.
म्हणून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होण्यासाठी राज्य सरकारने किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी दिल्याचे, प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
वाईन म्हणजे दारू नसल्याचे मंत्री थोरात यांनी शिर्डीत स्पष्ट केले.महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसचे जेष्ठनेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहावर कार्यकर्त्यांची भेट घेतली.
यावेळी शिर्डी शहर काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले की, कोरोनाची तिसरी लाट नक्कीच आहे. ही वस्तुस्थिती असल्याचे त्यांनी मान्य केले.
त्यामुळे प्रत्येकाने लसीचे दोन डोस घेणे गरजेचे आहे. ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले आहे. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतरही त्रास कमी जाणवला आहे.
किराणा दुकान, माँलमध्ये वाईन विक्रिसाठी राज्य शासनाने परवानगी दिली आहे. सध्या स्थितीत द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असल्याचे मंत्री थोरात यांनी सांगितले..
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम