अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :- घरात कोणाला काही एक न सांगता युवती घराबाहेर गेली. ती अद्याप घरी परतली नाही. ही घटना नगर-पुणे रोडवरील केडगाव वेशीजवळ घडली आहे.
याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात निलेश फंड (रा. शिक्रापुर जि. पुणे) यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी हरवल्याची नोंद केली आहे.
अधिक तपास पोलीस हवालदार बी. एम. इखे करीत आहेत. हरवलेल्या तरूणीचे नाव प्रतीक्षा असून रंग गोरा, उंची पाच फुट तीन इंच, शरीर बांधा सडपातळ, डोक्याचे केस काळे, लांब, नाक सरळ, दात शाबूत,
नेसणीस लाल रंगाचा पंजाबी ड्रेस, पायात चप्पल, जवळ इंटेल कंपनीचा साधा फोन आहे. या वर्णनाच्या तरूणीबद्दल कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी कोतवाली पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा, असे आव्हान पोलिसांनी केले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम