कोरोनाविरुद्धचा एन-95 मास्क बाबत आली अत्यंत महत्वाची माहिती… नक्की जाणून घ्या

Published on -

अहमदनगर Live24 टीम, , 01 फेब्रुवारी 2022 :- गेल्या दोन वर्षाहून अधिक काळ धुमाकूळ घालत असलेला व्हायरस कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे. या विषाणूच्या विरुद्ध लढणायसाठी मास्क हाच एकमेव उपाय ठरतो आहे.

यातच बाजरात विविध मास्क देखील उपलब्द्ध आहे. मात्र आता या लढाईत अत्यंत प्रभावी मानला जाणार एन95 मास्कबाबत एक अत्यंत महत्वाची माहिती समोर आलीआहे.कोणता मास्क कितीदा वापरावा याबाबत आज आम्ही तुमहाला सांगणार आहोत

सध्या वापरात असलेले मास्क

  • – एन-९५
  • -डबल लेअर
  • – सर्जिकल – कापडी

कोणता मास्क कितीदा वापरावा?

  • – मास्क दिवसभर लावून फिरलात तर तो मास्क दुसऱ्या दिवशी वापरू नये, असा नियम आहे.
  • – त्यातही मास्क कापडाचा असेल तर तो वापरून झाल्यावर धुण्यास टाकावा.
  • – सर्जिकल मास्क एकदाच वापरावा. त्यानंतर तो फेकून द्यावा.

एन-९५ मास्कबाबत… – एन-९५ किंवा केएन-९५ मास्क थोडे दिवस वापरता येऊ शकतात.

  • -अमेरिकेच्या सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) यांच्या मते एन-९५ मास्क किमान पाच वेळा वापरता येऊ शकतो.
  • -कार्यालयीन कामकाजाच्या पूर्ण वेळेत एन-९५ मास्क वापरणे शक्य नाही, असेही सीडीसीचे म्हणणे आहे.
  • – मास्क किती वेळा वापरावा यापेक्षा तो कितीदा वापरला गेला, हे महत्त्वाचे आहे.
  • -कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील तज्ज्ञांच्या मते एन-९५ मास्क दोन किंवा तीन दिवस वापरणे योग्य ठरते.

धोका काय? – एन-९५ मास्क लावल्यानंतर श्वास घेतेवेळी काही धुलिकण मास्कवर अडकतात.

  • – मास्कवर मोठ्या प्रमाणात धुलिकण जमल्यास श्वासोच्छवास घेण्यास त्रास होतो.
  • – या सगळ्यांमुळे एन-९५ मास्कची परिणामकारकता घटण्याचा धोका असतो.
  • – त्यामुळे शक्यतो हा मास्क दोन ते तीन दिवसच वापरावा असे तज्ज्ञांचे मत आहे.
  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
  • फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News