अहमदनगर Live24 टीम, , 01 फेब्रुवारी 2022 :- नगर तालुक्यातील जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रातील तब्बल दहा आरोग्य कर्मचारी कोरोना बाधित झाले असून, त्यामध्ये वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांचा देखील समावेश असल्याने गावामध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एकूण १६ जणांचा स्टाफ आहे. त्यामधील दहा जणांना कोरोना ची बाधा झाल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण पडल्याचे चित्र दिसून येत आहे.
कोरोना बाधितांमध्ये आरोग्य अधिका-याचा देखील समावेश आहे. आरोग्य केंद्रातील १० कर्मचारी कोरोना बाधित आढळून आलेली उर्वरित कर्मच-यांवर कामाचा
ताण वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. जेऊर परिसरातील सर्व नागरिकांनी कोरोना बाबत काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम