ट्रॅक्टर अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, , 01 फेब्रुवारी 2022 :- बांधावरील झाडाचे खोड तोडण्याच्या कारणावरून राहुरी तालूक्यातील कात्रड येथे जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. तसेच लाकडी दांड्याने बेदम मारहाण करण्यात आली.

ही घटना दिनांक ३१ जानेवारी रोजी घडलीय. प्रसाद सखाराम दांगट वय ४५ वर्षे राहणार कात्रड ता. राहुरी. यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दिनांक ३१ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजे दरम्यान प्रसाद दांगट हे त्यांचे शेतात काम करत होते.

तेव्हा आरोपींनी गैरकायद्याची मंडळी एकत्रित जमून सामायिक बांधावरील झाडाचे खोड काढण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन आले. तेव्हा आरोपींना प्रसाद दांगट म्हणाले की, तुम्ही पहिले जमिनीची मोजणी करून घ्या. नंतर झाडाचे खोड काढा. असे म्हणाल्याचा आरोपींना राग आला.

त्यांनी प्रसाद दांगट यांना चिरडून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घातला. तेव्हा त्यांची आई चंद्रभागा ही सोडवा सोडव करण्यासाठी आली.

तिला देखील आरोपींनी पकडून मारहाण केली. तसेच तिला जिवे मारण्याच्या उद्देशाने तिच्या डोक्यात, हातावर लोखंडी रॉडने मारून गंभीर जखमी केले.

त्यावेळी फिर्यादीचे चुलते साहेबरावची बापू दांगट व मुलगा सूरज दांगट हे भांडणे सोडवा सोडवी करण्यासाठी आले. त्यांना देखील शिवीगाळ करून लाकडी दांड्याने मारहाण केली.

तसेच मुलगा सूरज दांगट, सुधीर दांगट व लताबाई दांगट यांना खाली पाडुन जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांचा गळा दाबला. असे फिर्यादीत म्हटले आहे.

प्रसाद सखाराम दांगट यांच्या फिर्यादीवरून आरोपी सुधीर अशोक दांगट, अशोक केशव दांगट, जालिंदर केशव दांगट, प्रदीप जालिंदर दांगट, सतीष जालिंदर दांगट, लताबाई अशोक दांगट, जनाबाई अशोक दांगट, रोहीणी प्रदिप दांगट,

अश्विनी सतिष दांगट सर्व राहणार कात्रड ता. राहुरी. या नऊ जणांवर जबर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक सज्जन नाहरेडा हे करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe