अहमदनगर Live24 टीम, , 01 फेब्रुवारी 2022 :- राहुरी तालुक्यातील पिंप्री-वळण येथील मुळा नदीपात्रात पोहोण्यासाठी गेलेला अनिल दिगंबर जाधव (वय 35 वर्ष) याइसमाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
या घटनेमुळे वळण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी, सोमवारी दुपारच्या दरम्यान वळण मुळा नदीपात्रात हा इसम पोहोण्यासाठी गेला असता पाण्याच्या अंदाज न आल्याने तो बुडू लागला.

file photo
तेथील धुणे धुणार्या महिलांनी बघितले असता त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. मात्र, तोपर्यंत त्याचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच स्थानिकांनी नदीपात्राकडे धाव घेत मृतदेह बाहेर काढला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम