‘या’ दोन अ‍ॅपद्वारे होऊ शकते तुमची फसवणूक; अहमदनगर जिल्ह्यात 40 जणांना गंडा

अहमदनगर Live24 टीम, , 01 फेब्रुवारी 2022 :- सायबर गुन्हेगाराकडून ऑनलाईन फसवणूकीचे वेगवेगळे फंडे वापरले जात आहे. मोबाईलवर ‘ऐनी डेस्क’ आणि ‘टिम व्हीवर’ हे दोन अ‍ॅप डाऊनलोड करून त्याचा अ‍ॅक्सेस घेत सायबर गुन्हेगार फसवणूक करत आहेत.

जिल्ह्यातील अनेकांची याद्वारे फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. येथील सायबर पोलीस ठाण्यात अलीकडच्या काळात या दोन अ‍ॅपद्वारे फसवणूक झालेल्या 40 तक्रारी दाखल झाल्या आहेत.

एखादा फोन आल्यानंतर समोरचा व्यक्ती ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी सुरूवातीला आपल्याला मोबाइलवर हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगतो.

मोबाइलवर अ‍ॅक्सेस मिळाल्यावर तो व्यक्ती आपल्या खात्यामधील रक्कम त्याच्या खात्यात वळवून घेतो. जिल्ह्यात असे फसवणूकीचे प्रकार समोर येत आहेत.

अलीकडच्या काळात येथील सायबर पोलीस ठाण्यात 40 व्यक्तींनी तक्रार दाखल केल्या आहेत. त्यामुळे आता ऑनलाईन चोरीसाठी ‘ऐनी डेस्क’ आणि ‘टिम व्हीवर’ अ‍ॅपचा वापर करताना सावधानता बाळगण्याचे आव्हान सायबर पोलिसांनी केले आहे.

गूगल प्ले स्टोअर मधून जाऊन हे अ‍ॅप कोणीही सहज डाऊनलोड करू शकतो. या अ‍ॅपच्या माध्यमातून कोणीही दुसर्‍या व्यक्तीचा मोबाइल, लॅपटॉप कॉम्प्युटर बसल्या जागेवरुन हाताळू शकतात.

मोबाइल किंवा कॉम्प्युटरची संपूर्ण माहिती बसल्या जागेवर दिसते. पण हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा तुम्ही तुमच्या या अ‍ॅपचा कोड दुसर्‍याला दिला असेल.

त्यामुळे हे अ‍ॅप एक तर वापरू नका किंवा फक्त ओळखीच्या व्यक्तीला आपल्या मोबइल, लॅपटॉप मधील अडचणी सोडविण्यासाठी सांगा, असे आव्हान सायबर पोलिसांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe