अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार; या ठिकाणी घडली घटना

Published on -

अहमदनगर Live24 टीम, , 01 फेब्रुवारी 2022 :- संगमनेर तालुक्यातील वडगावपान शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार झाला. याबाबत अधिक माहिती अशी, वडगावपान शिवारात रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्या अज्ञात वाहनाची धडक बसली.

त्यामुळे गंभीर जखमी होत बिबट्या जागीच ठार झाला. दरम्यान या घटनेची माहिती स्थानिक रहिवाशांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी मृत बिबट्याला निंबाळे रोपवाटिकेत हलविले. शवविच्छेदन केल्यानंतर बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वडगावपान शिवारात बिबट्याचे वास्तव्य अधोरेखित झाले आहे.

तर यापूर्वीही अशाच पद्धतीने बिबट्यांना कोल्हार घोटी राज्यमहामार्ग, पुणे – नाशिक राष्ट्रीय महामार्गांवर वारंवार अज्ञात वाहणाच्या धडकेत आपले जीव गमवावे लागले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News