वाळू तस्करांना पोलिसांचा दणका २६ लाखांच्या बोटी जप्त करून केल्या नष्ट

Published on -

अहमदनगर Live24 टीम, , 03 फेब्रुवारी 2022 :-  श्रीगोंदा तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात यांत्रिक फायबर बोटीच्या सहाय्याने अवैध वाळूचा उपसा करणाऱ्यांना श्रीगोंदा पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे.

वाळूतस्करांच्या २६ लाखांच्या तीन बोटी जप्त करून जिलेटीनच्या साहाय्याने फोडल्या. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे .

राजेश मोरे , सुशांत मोरे अशी त्यांची नावे आहेत . या बाबत अधिक माहिती अशी पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना गुप्त बातमीदाराने माहिती दिली की,

श्रीगोंदा तालुक्यातील गार शिवारात भीमा नदीच्या पात्रात यांत्रिक फायबर बोटीच्या सहाय्याने विनापरवाना अवैध वाळूचा उपसा होत असल्याची माहिती दिली.

त्यानुसार पोलीस पथकाने छापा टाकला असता गार गावाच्या शिवारात भिमा नदीपात्रात राजेश मोरे सुशांत मोरे यांच्या मालकीच्या दोन फायबरव एक हायड्रोलिक बोट हे डिझेल इंजिन यंत्राच्या सहाय्याने नदी पात्रात उपसा करत असताना मिळून आले .

पोलिसांनी छापा टाकताच फायबर बोटी व सेक्शन मधील ईसम हे नदीतील पाण्यात उड्या मारुन पळून गेले .

दोन फायबर बोटी व एक हायड्रोलिक बोट असा सुमारे २६ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून जिलेटीनच्या सहाय्याने तो नष्ट करण्यात आला .

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News