अहमदनगर Live24 टीम, , 03 फेब्रुवारी 2022 :- जिल्ह्यात सध्या चोरट्यांनी नुसता धुमाकूळ घातला आहे. शेवगाव तालुक्यातील व शेवगांव शहरातील जुन्या चोऱ्यांचा तपास लगत नाही तोच शेवगांव पोलिसांची डोकेदुखी वाढविणाऱ्या घटना घडत आहेत.
येथे एकाच दिवशी दोन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत. येथील अशोक नागु धोत्रे याचे घर फोडुन उचका पाचक करत १५ हजार रुपये व दागिने चोरी गेले.
याच परिसरात गंगुबाई तुकाराम माने यांच्या घराची खिडकी तोडुन चोरट्यांनी घरात घुसून २० हजार रुपये लंपास केले. गणेशनगरमध्ये भरवस्तीत धाडसी चोरी झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण झाले आहे.
याबाबत भल्या पहाटेच शेवगाव पोलिसांना नागरिकांनी कळवले. मात्र सकाळी उशिरापर्यंत या ठिकाणी पोलिस अधिकारी फिरकले नव्हते.
सध्या ग्रामीण भागात शेतातील मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत त्यामुळे बहुसंख्य नागरिक सकाळी लवकर शेतात जातात पर्यायाने दिवसा व रात्री उशिरापर्यंत ते शेतात काम करत असल्याने या काळात घर बंद असते.
त्यामुळे अनेकदा या संधीचा चोरटे फायदा घेत घरफोडी करतात. तसेच रात्री देखील चोरी करत आहेत. त्यामुळे आता नागरिकांना शेतातील काम करण्यासोबतच रात्री जागे राहावे लागत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम