अहमदनगर Live24 टीम, , 03 फेब्रुवारी 2022 :- राहुरी तालुक्यातील ब्रांम्हणगाव भांड परीसरातील तनपुरे कारखान्याच्या माजी संचालकांच्या बंगल्यावर धाडसी दरोडा पडला असून अंदाजे १४ तोळे सोने व रोख रक्कम चोरट्यांनी चोरून पोबारा केला आहे.
दरोडाा पडत असताना घरातील महिला उठली असताना चोरट्याने सत्तूर दाखवून धमकावत हि धाडसी चोरीची घटना घडलीय……
तर दुसरीकडे राहुरी शहरात देखील एका फरसाण दुकानाची भिंत फोडून तेलाचे डबे, फरसाण व रोख असा अंदाचे ४५ हजाराच्या मुद्देमालावर डल्ला मारला…
त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. गुरुवारी पहाटेच्या दरम्यान रमेश वारुळे यांच्या ब्राम्हणगाव भांड येथील बंगल्याच्या मागील दरवाज्याचा कडी-कोंडा तोडून अज्ञात तीन चोरट्यांनी घरात प्रवेश करून
कपाट फोडून सामानाची उचकापाचक करत घरातील मौल्यवान दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी चोरुन नेली आहे.तर दुस-या घरातील कपाटच या चोरट्यांनी उचलुन घेऊन
जवळच्या शेतात नेऊन फोटून त्यातील देखील ऐवज चोरून नेत हा धाडसी दरोडा टाकला आहे…..घटनेची माहिती समजताच डिवायएसपी संदिप मिटके सह राहुरी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे
यांनी घटस्थळी धाव घेत अधिक माहिती घेत तपासायची चक्रे फिरवली आहे. दरम्यान घटनास्थळी श्वान,तसे तज्ञ पथकाने देखील भेट दिली आहे. रात्रीच्या दरम्यान पोलिसांनी गस्त सुरू करावी अशी मागणी होत आहे
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम