‘सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे या दारु पिऊन…’ बंडातात्यांच्या आरोपाने उठला गदारोळ

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- साताऱ्यामध्ये बंडातात्या कराडकर यांनी वाईन विक्रीच्या विरोधात आंदोलन केलं होतं. या आंदोलनादरम्यान त्यांनी सुप्रिया सुळे तसेच पंकजा मुंडे या दारू पितात असा थेट आरोप केला आहे.

सुप्रिया सुळे राजकारणात येण्यापूर्वी त्यांचे दारू पिऊन रस्त्यावर पडलेले फोटो तुम्हांला ढीगाने सापडतील असा दावा बंडातात्या कराडकर यांनी केला आहे.

त्यानंतर आता राज्य महिला आयोगाने सातारा पोलिसांना बंडातात्या कराडकर यांच्यावर कडक कारवाई करून पुढील ४८ तासांत अहवाल सादर करावा असे आदेश दिले आहेत.

याबद्दल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकण यांनी अधिक माहिती दिली आहे. ‘ बंडा तात्या कराडकर यांनी खासदार सुप्रियाताई सुळे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल जे वादग्रस्त वक्तव्य केल आहे, ते अत्यंत संतापजनक आहे.

त्यांच्या या वक्त्व्यामुळे महिलांच्या आत्मसन्मानाला व प्रतिष्ठेला धक्का पोचलेला आहे. याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असुन त्याबाबत सातारा पोलीसांनी या वक्तव्याबाबत बंडा तात्या कराडकर यांच्यावर कडक कारवाई करुन याचा अहवाल 48 तासाच्या आत अहवाल आयोगास सादर करावा.

तसेच बंडा तात्या कराडकर यांनी सात दिवसाच्या आत आपला लेखी खुलासा आयोगास सादर करावा.’ असं रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत.

यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी बंडातात्या कराडकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

‘महाराष्ट्राच्या महिला लोकप्रतीनिधी व लोकनेत्याच्या लेकींना दारू पिऊन नाचतात’ म्हणनारे बंडातात्या वारकरी संप्रदयाला लागलेला डाग आहे.

तात्याला येरवड्यात उपचाराची गरज समस्त महिलांची तात्काळ माफी मागावी अन्यथा खळखट्याक अटळ आहे.’ असा घणाघात रुपाली पाटील यांनी केला आहे.