अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- शिर्डी ते झगडेफाटा दरम्यान ब्रॅच चारीजवळ अज्ञात वाहनाने निमगाव र्कोहाळे (निमशेवडी) येथील एकनाथ जयराम डांगे या वयोवृद्धाच्या मोपेडला जोराची धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
ते (एमएच १५ सी एक्स ४३४७) क्रमांकाच्या मोपेडवरून प्रवास करीत होते. अपघात घडलेल्या ठिकाणी रस्त्याचे काम चालू असुन रस्त्याच्या दोन्ही बाजूला डिव्हायडर बसवलेले असल्याने समोरून ये-जा करणाºया वाहनाला लहान वाहनांचा अंदाज येत नाही.
त्यातुन अज्ञात वाहनांच्या धडकेत डांगे यांचा अपघातात मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अपघात घडल्यानंतर शिर्डी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली.
अपघातस्थळी जमलेल्या नागरीकांनी जखमी डांगे यांना उपचारासाठी साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात दाखल केले.
मात्र उपचारापूर्वीच ते मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषीत केले.
याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. असुन अधिक तपास शिर्डी पोलीस करीत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम