‘ती’ गॅस पाईपलाईन उठली नागरिकांच्या मुळावर..! नगर -दौंड रस्त्यावर खंडाळा येथे अपघात; तरुण गंभीर जखमी

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :-  नगर- दौंड रस्त्यावर गॅसच्या पाईपलाईनचे काम सुरू असून, कामात नियोजन नसल्याने नियोजन शून्य कामामुळे नागरिक वैतागले आहेत. त्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी दिला आहे.

खंडाळा शिवारात गॅसच्या पाइपलाईनच्या कामाच्या चुकीच्या नियोजनामुळे अपघात घडल्याचा आरोप परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात आला.

अपघातात किरण प्रताप टेकाडे (वय ३४ रा. खंडाळा) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. नगरकडून दौंडकडे जाणाऱ्या कारने (क्र. एम. एच. १५ ई. एक्स. ३६६४) दुचाकीला दिलेल्या धडकेत तरुण गंभीर जखमी झाला आहे.

सदर अपघात गॅसच्या पाईपलाईन मुळे झाला असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. रस्त्याच्या कडेने गॅसच्या पाईपलाईनचे काम चालू असल्यामुळे रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेली माती, वाहने व पाईपामुळे रस्त्यावर वारंवार अपघात घडत आहेत.

गॅसच्या पाइपलाईनच्या कामामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून, संबंधित ठेकेदार व प्रशासनाला वारंवार सांगूनहीफरक पडलेला नाही.

त्यामुळे आता शिवसेना स्टाईलने उत्तर देणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe