वीज सुरळीत न झाल्यास आंदोलन… शेतकर्‍यांचा उर्जामंत्र्यांना इशारा

Published on -

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात महावितरणाच्या लोडशेडिंगमुळे हाता तोंडाशी आलेले पीक वाया जाणाच्या मार्गावर आहेत.

यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर संतप्त झाले आहे. तसेच पुढील पाच दिवसात म्हणजेच 9 फेब्रुवारीपर्यंत वीज सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा संतप्त शेतकर्‍यांनी उर्जामंत्र्यांना तसेच वीज वितरणच्या अधिकार्‍यांना दिला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्यातील राक्षी, रावतळे, कुरुडगाव, ठाकूर निमगाव, माळेगाव, सोनेसांगवी या गावांसाठी राक्षी एकमेव फिडर असल्याने,

त्या फिडरवर लोड येतो. त्यामुळे या भागातील शेतकर्‍यांनी उपकार्यकारी अभियंता, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, आमदार, उर्जामंत्री यांना निवेदन दिले आहे.

लोडशेडींग व विजेसंदर्भात लवकर दखल घेतली गेली नाही तर, 9 फेब्रुवारीला उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालास टाळे ठोकून आंदोलन करण्याचा इशारा निवेदनामध्ये शेतकर्र्‍यांनी दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News