दुचाकीबाबत मालकी हक्काची कागदपत्रे दाखविता न आल्याने चोरीचे बिंग फुटले…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- भिंगार पोलिसांनी दुचाकीबाबत एकाकडे चौकशी असता त्याच्याकडील दुचाकीबाबत त्याला मालकी हक्काची कागदपत्रे दाखविता आली नाही.

त्यास विश्‍वासात घेतले असता त्याने अन्य दोन साथीदारांच्या मदतीने दुचाकी चोरी केली असल्याची कबूली दिली. भिंगार कॅम्प पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

दीपक दिलीप साके (रा. दाणी पिंपळगाव ता. आष्टी जि. बीड), राहुल छगन काळे (रा. अंभोरा ता. आष्टी जि. बीड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून चोरलेली एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. या टोळीतील अक्षय सुनील काळे (रा. चिंचोडी पाटील ता. नगर) हा साथीदार सध्या पसार आहे.

बबन फकिरा मोकाटे (वय 48 रा. इमामपूर ता. नगर) यांची दुचाकी (यूपी 32 डीयू 6122) भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेली होती. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

भिंगार कॅम्पचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांना खबर्‍याकडून माहिती मिळाली की, दाणी पिंपळगाव (ता. आष्टी) येथील दीपक साके याच्याकडे चोरीची दुचाकी आहे.

पोलीस पथकाने दीपक साके याच्याकडे चौकशी केली. त्याच्याकडील दुचाकीबाबत त्याला मालकी हक्काची कागदपत्रे दाखविता आली नाही.

त्यास विश्‍वासात घेतले असता त्याने आरोपी राहुल काळे आणि अक्षय काळे यांच्या मदतीने दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

या माहितीच्या आधारे राहुल काळे यास अटक करण्यात आली आहे. अक्षय काळे हा पसार झाला आहे. पोलीस नाईक विनोद गंगावणे हे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News