रेल्वे स्थानकाचा बोर्ड पिवळाच का असतो ? वाचा यामागील कारण…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आपण सर्वांनी कधी ना कधी ट्रेनमधून प्रवास केलाच असेल. भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे आणि आशियातील दुसरे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. दररोज लाखो प्रवासी रेल्वेतून प्रवास करतात. (Why is the railway station board yellow)

देशात 7000 हून अधिक रेल्वे स्थानके आहेत. प्रत्येक रेल्वे स्थानकाचा साईन बोर्ड नेहमीच पिवळा असतो हे तुमच्या लक्षात आलेच असेल.

पण, तुम्हाला माहीत आहे का, रेल्वेचे साईन बोर्ड नेहमी पिवळे का रंगवले जातात? चला तर मग आज आम्ही तुम्हाला या मागचे मनोरंजक कारण सांगतो –

सूर्यप्रकाशाचा थेट संबंध
बोर्ड पिवळा असण्याचे पहिले कारण म्हणजे हा रंग थेट सूर्यप्रकाशाशी संबंधित आहे. हा रंग ऊर्जेचे प्रतीक आहे आणि त्याचा मनावर खूप सकारात्मक प्रभाव पडतो. बाकीच्या रंगांपेक्षा या रंगाची पार्श्वभूमी अधिक प्रभावी आहे.

याशिवाय पिवळ्या फळ्यावर काळ्या रंगात लिहिलेले शब्द दुरूनच स्पष्ट दिसतात. त्यामुळे डोळ्यांवर कोणताही ताण पडत नाही.

अशा स्थितीत पिवळा बोर्ड पाहून ट्रेनचा लोको पायलटही सावध होतो. तो हॉर्न वाजवत राहतो, त्यामुळे स्थानकावर उपस्थित प्रवासीही सतर्क होतात आणि कोणत्याही प्रकारचा अपघात होण्याची शक्यता नसते.

दुरून दिसणारा पिवळा रंग
पिवळा रंग निवडण्याचे दुसरे कारण म्हणजे तो दुरून दिसतो. ट्रेनच्या ड्रायव्हरला दुरूनच पिवळा रंग दिसतो आणि पुढे स्टेशन असल्याचं कळतं. मग तो त्याच्या ट्रेनचा वेग कमी करतो.

यासोबतच स्टेशन जवळ आल्यावर चालक अधिक सतर्क होतो. यासोबतच शाळेची बस पिवळी असल्याचेही तुमच्या लक्षात आले असेल. यामागेही हेच कारण आहे.